‘वीजबिल फसवणुकप्रकरणी ९५ गुन्हे दाखल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वीजबिल फसवणुकप्रकरणी ९५ गुन्हे दाखल’
‘वीजबिल फसवणुकप्रकरणी ९५ गुन्हे दाखल’

‘वीजबिल फसवणुकप्रकरणी ९५ गुन्हे दाखल’

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : महवितरणच्या वीजग्राहकांची बनावट मेसेजद्वारा ऑनलाइन वीजबिल भरण्याबाबत फसवणूक होत असल्याबाबत राज्यात ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच महावितरणचा कोणताही डेटा लीक झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

महावितरणाच्या ग्राहकांच्या बनावट संदेशाद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत विधानसभेत आमदारांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. महावितरणच्या वीजग्राहकांचा रजिस्टर मोबाईल नंबरचा डेटा लीक झाल्यामुळेच ऑनलाइन देयकाबाबत बनावट संदेश पाठविण्यात येत आहेत का, असा प्रश्‍न आमदारांनी उपस्थित केला त्यास उत्तर देताना उपख्यमंत्री फडणवीस यांनी डेटा लीक झाला नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, बनावट एसएमएस महावितरणकडे नोंदणीकृत असलेल्या किंवा नसलेल्या मोबाईल क्रमांकावर येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारच्या संदेशांमध्ये ग्राहकांचा वैयक्तिक किंवा वीजबिलासंबंधी तपशील आढळून येत नाही. तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनीही बनावट संदेशाद्वारे फसवणूक करणाऱ्या संदेशाला प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले आहे.