Sun, April 2, 2023

सुखकर्ता महिला मंचातर्फे जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार
सुखकर्ता महिला मंचातर्फे जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार
Published on : 15 March 2023, 12:51 pm
पुणे, ता. १५ ः सुखकर्ता महिला मंचातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ‘राजमाता जिजाऊ जीवनगौरव पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माधुरी ठोंबरे, दुर्गा नागरी पतसंस्थेच्या माजी प्रमुख सल्लागार ॲड. शालिनी डबीर आणि आहारविषयक मार्गदर्शिका हेमलता गडकर यांना लेखिका संगीता वेताळ यांच्या हस्ते गौरवण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेविका उषा जगताप, सुभाष जगताप उपस्थित होते. या वेळी नीलम शिंगाडे, शरयू रावेतकर, बदाम बाफना, वृषाली चव्हाण, मुग्धा कुलकर्णी, माधवी मुरकुटे, प्रा. सुधा पाटील, शारदा सरोदे, सुचेता गोंगले, अनुराधा वाळवेकर, गौरी पाठक यांना ‘राजमाता जिजाऊ समाजभूषण पुरस्कारा’ने सन्मानित केले. प्रास्ताविक मंचाच्या अध्यक्षा डॉ. अर्चना जोशी यांनी केले.