पल्सर एनएस सिरीजचे दोन व्हेरिएण्ट्स रिलाँच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पल्सर एनएस सिरीजचे 
दोन व्हेरिएण्ट्स रिलाँच
पल्सर एनएस सिरीजचे दोन व्हेरिएण्ट्स रिलाँच

पल्सर एनएस सिरीजचे दोन व्हेरिएण्ट्स रिलाँच

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : बजाज ऑटो या प्रख्यात दुचाकी व तीनचाकी कंपनीने त्यांचा स्पोर्टस् मोटरसायकल ब्रॅण्ड पल्सर एनएस सिरीजचे दोन व्हेरिएण्ट्स रिलाँच केले. पल्सर एनएस सिरीजची विक्री जवळपास ३० देशांमध्ये होते. पल्सर एनएस २०० व पल्सर एनएस१६० ही मॉडेल्स आकर्षक आणि शक्तीशाली आहेत.
या दोन्ही मॉडेल्समध्ये सर्वोत्तम हँडलिंग व उच्च सुरक्षितता, अशी वैशिष्ट्ये आहेत. जलद कॉर्नरिंग व चपळ हाताळणीची सुविधा या मॉडेल्समध्ये आहेत. या बाइक्स अधिक शक्तिशाली असून सर्वांचे लक्ष वेधून घेतात. डिस्प्ले कंसोलमध्ये आता गिअर पोझिशन इंडिकेटर आहे. ज्यामुळे राइडर्सना आता गिअर्सची माहिती मिळू शकते आणि ते ट्रॅक रेसिंग व रस्त्यावरील राइडिंग वाढवण्यासोबत त्यावर नियंत्रण ठेवू शकतात. याव्यतिरिक्त नवीन पल्सर्सचे सिग्नेचर वैशिष्ट्य इन्फिनिटी डिस्प्लेमध्ये डिस्टन्स-टू-एम्प्टी रिड आउट, असून फ्युएल इकॉनॉमी आहेत.
अपग्रेड्सबाबत बजाज ऑटो लिमिटेडचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले, ‘‘एनएस सिरीज लेटिन अमेरिका व आशियातील अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. नवीन पल्सर एनएस २०० व एनएस १६०या बाइक्स आकर्षक दिसण्यासोबत सर्वोत्तम परफॉर्मन्स देतात.’’ दोन्ही मॉडेल्स मेटलिक पर्ल व्हाइट, ग्लॉसी इबोनी ब्लॅक, सेंटिन रेड आणि प्यूटर ग्रे रंगात उपलब्ध आहेत.