शिष्यवृत्तीसाठी करा ३१ मार्चपूर्वी अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्तीसाठी करा ३१ मार्चपूर्वी अर्ज
शिष्यवृत्तीसाठी करा ३१ मार्चपूर्वी अर्ज

शिष्यवृत्तीसाठी करा ३१ मार्चपूर्वी अर्ज

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ३१ मार्चपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने केले आहे. केंद्रासह राज्य सरकारने उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या जाहीर केल्या आहे. महाडीबीटी पोर्टलवर यासंबंधीचे अर्ज करता येतात. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी अर्ज करावे, असे सूचित केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ७८ टक्केच विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे व प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
संकेतस्थळ ः https://mahadbt.maharashtra.gov.in