Sat, April 1, 2023

शिवण्यात महिलांसाठी विविध उपक्रम
शिवण्यात महिलांसाठी विविध उपक्रम
Published on : 16 March 2023, 1:21 am
शिवणे, ता. १६ ः महिलांना त्यांच्या दैनंदिन कामातून थोडे मनोरंजन मिळावे, यासाठी महागणपती मल्टिस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटी लि. शिवणे शाखेच्या वतीने महिनाभर उपक्रम राबविण्यात येत आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवणे आणि कोंढवे-धावडे परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये महिलांसाठी रांगोळी, प्रश्नमंजूषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी महागणपती मल्टिस्टेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विकास बेंगडे, मुख्य समन्वयक अक्षय पवार, संचालक पवन हगवणे, महेश शिंदे, दिलीप गायकवाड, खुशाल मुनोत, मिहीर चंगेडिया, शाखाध्यक्ष प्रशांत मोरे, संगीता मरोळ, हेमांगी गबदूले आदी उपस्थित होते.