कोंढव्यातील शत्रुंजय चौकातील कामामुळे वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंढव्यातील शत्रुंजय चौकातील कामामुळे वाहतुकीत बदल
कोंढव्यातील शत्रुंजय चौकातील कामामुळे वाहतुकीत बदल

कोंढव्यातील शत्रुंजय चौकातील कामामुळे वाहतुकीत बदल

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : कोंढवा विभागातील शत्रुंजय चौकातील भुयारी मार्ग आणि ग्रेड सेपरेटर वॉलचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी शनिवार (ता. १८)पासून काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
कोंढवा-कात्रज मार्गावरील टिळेकरनगर जंक्शन येथून येवलेवाडी गावाकडे जाणारा मार्ग हा तात्पुरत्या स्वरूपात एकेरी मार्ग करण्यात येत आहे. येवलेवाडी गावाकडून कोंढवा-कात्रज मार्गावरील टिळेकरनगर जंक्शन येथे वाहनांना येण्यास बंदी करण्यात येत आहे. त्यावर पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालकांना शत्रुंजय चौकातून शिवपार्वती कार्यालय येथून यु-टर्न घेऊन इच्छित स्थळी जाता येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.