‘समाविष्ट गावांना निधी कमी पडू देणार नाही’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘समाविष्ट गावांना निधी कमी पडू देणार नाही’
‘समाविष्ट गावांना निधी कमी पडू देणार नाही’

‘समाविष्ट गावांना निधी कमी पडू देणार नाही’

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : पुण्याच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या ३४ गावांचा पायाभूत सुविधा व नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी या गावांचा महापालिकेत समावेश केला आहे. या ३४ गावांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे महानगरपालिकेत समाविष्ट २३ गावांच्या पायाभूत सोयीसुविधांच्या गैरसोयीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘पुणे महापालिकेत समाविष्ट ३४ गावांपैकी ११ गावांसाठीचा विकास आराखडा पुणे महापालिकेमार्फत तयार करण्यात येत आहे. तसेच २३ गावांसाठीचा विकास आराखडा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत तयार करण्यात येत आहे. १ हजार २०० कोटींचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. या गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन योजना व इतर सर्व योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या गावांना सर्व मूलभूत सोयी देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिकेत आहे. तर लोकसंख्येचा विचार करून नगरसेवकांची संख्या ठरवण्यात येते. फेररचनेमध्ये नगरसेवकांच्या संख्येबाबत सर्वंकष विचार करण्यात येईल, असेही उत्तर एका प्रश्‍नाला मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.