राज्यातील ५० टक्के शिक्षकांना प्रथम पसंतीची बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील ५० टक्के शिक्षकांना प्रथम पसंतीची बदली
राज्यातील ५० टक्के शिक्षकांना प्रथम पसंतीची बदली

राज्यातील ५० टक्के शिक्षकांना प्रथम पसंतीची बदली

sakal_logo
By

राज्यातील ५० टक्के शिक्षकांना मिळाली पसंतीची शाळा

सम्राट कदम ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ः राज्यातील तब्बल ५० टक्के प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या पसंतीच्या शाळेत शिकविण्याची संधी मिळाली आहे. जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक भरती प्रक्रियेतील संवर्ग एक आणि दोन मधील १० हजार ९० अर्जदारांपैकी सहा हजार १५६ शिक्षकांची बदली त्यांच्या प्रथम पसंतीच्या ठिकाणी करण्यात आली आहे. बदलीसाठी पात्र शिक्षकांपैकी ३४ हजार ९६४ शिक्षकांची बदली प्रकिया आज अखेर पूर्ण झाली आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून एप्रिल २०२१ च्या धोरण निश्चितीनूसार ऑनलाईन पद्धतीने प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्यभरातील बदली प्रक्रिया पार पाडली. ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण आणि विद्यमान शाळेत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शिक्षकांची तरतूद जिल्हांतर्गत बदली करताना करण्यात आली होती. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी सहा टप्यांद्वारे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. ३९ हजार २८६ सहभागी शिक्षकांपैकी ३४ हजार ९६४ शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाली असून, अवघड क्षेत्रातील शिक्षकांची बदली प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती प्रसाद यांनी दिली.
------
राज्यातील बदलीचा तपशील ः
बदलीचा प्रकार ः एकूण शिक्षक ः सहभागी शिक्षक ः बदली मिळालेले शिक्षक
संवर्ग एक ः ३१,८८८ ः ८,५०२ ः ६६९०
संवर्ग दोन ः ३,८१४ ः ३,६१९ ः ३,४००
बदलीसाठी अनिवार्य ः १६,१७५ ः ४,३०० ः ३,०३८
बदलीस पात्र ः २४,५९३ ः २२,८६५ ः २१,८३६
-------
अवघड क्षेत्रातील बदल्या
एकूण रिक्त जागा ः २९०२
प्रसिद्ध यादी ः २५१२
------------
संवर्ग एक ः दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त शिक्षक, विधवा शिक्षिका, परितक्ता, वयाची ५३ वर्ष पूर्ण झालेले शिक्षक, माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा अथवा नातू आदी
संवर्ग दोन ः जिल्हा परिषदेचे कर्मचारी असलेले पती-पत्नी
----------
बदली प्रक्रियेचे वैशिष्ट्ये ः
- पारदर्शक ऑनलाईन आणि स्वयंचलीत बदली प्रक्रिया
- गरजू किंवा सामाजिकदृष्ट्या दूर्बल शिक्षकांना पसंतीच्या ठिकाणी बदलीला प्राधान्य
- सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतरच निकषांच्या आधारे अवघड ठिकाणी बदली
- यामुळे अवघड अथवा दूर्गम क्षेत्रातील शिक्षकांनाही सर्वसाधारण क्षेत्रात बदलीची संधी मिळाली
----------------
कोट
अर्ज भरताना शिक्षकांनी केलेल्या प्रत्येक क्लिकची माहिती त्यांना मिळते. त्यामुळे अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही बदली प्रक्रिया पार पडली आहे. ५० टक्के शिक्षकांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाली असून, दूर्गम क्षेत्रातील शिक्षकांची बदलीही लवकरच पूर्ण होईल.
- आयुष प्रसाद, अध्यक्ष, बदली नियोजन समिती
----------------------