Thur, March 23, 2023

झंस्कार व्हॅलीविषयी दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन
झंस्कार व्हॅलीविषयी दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन
Published on : 17 March 2023, 12:41 pm
पुणे, ता. १७ ः मनाली ते लेह या महामार्गाला समांतर असलेली लक्षणीय आणि शीत वाळवंटात पहुडलेली झंस्कार व्हॅली आता पर्यटकांसाठी आकर्षण ठरू लागली असली तरी अद्याप अनेकांना अपरिचित आहे. त्यामुळे या व्हॅलीचे सौंदर्य दर्शन घडवणाऱ्या आणि त्याची माहिती सांगणाऱ्या ‘अपरिचित झंस्कार व्हॅली’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. २०) सायंकाळी ६.३० वाजता पर्वती येथील मित्रमंडळ चौकाजवळील महालक्ष्मी सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात गिर्यारोहक मिलिंद देशपांडे हा कार्यक्रम सादर करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.