Wed, March 22, 2023

‘स्वरभारती’ कार्यक्रमाचे आयोजन
‘स्वरभारती’ कार्यक्रमाचे आयोजन
Published on : 18 March 2023, 12:10 pm
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे ‘स्वरभारती’ कार्यक्रमांतर्गत शास्त्रीय उपशास्त्रीय गायनासह वाद्यवादन ऐकण्याची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. सोमवारी (ता. २०) सायंकाळी ५.३० वाजता सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यालयाचे पंडित शारंगधर साठे यांनी दिली.
कार्यक्रमाला पं. विकास कशाळकर, पं. राजेंद्र कुलकर्णी, पं.राजेंद्र कंदलगावकर, पं. प्रमोद मराठे, पं. रामदास पळसुले आदी उपस्थित राहणार आहेत. भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स मधील गुणी विद्यार्थ्यांचे गायन, वादन सादरीकरण यावेळी होणार आहे.