संत तुकाराम महाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज

sakal_logo
By

लोहगाव, ता १८ ः जगद्‍गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळ असलेल्या लोहगावचा उरुस उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तुकाराम बिजेपासून सुरू झालेला हा सोहळा अखंड हरिनाम सप्ताह गाथापारायणाने संपन्न झाला. नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनसेवेतून लोहगावकर, भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले. सात दिवस चाललेल्या या सप्ताहाची सांगता प्रवीण महाराज लोळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. श्री संत तुकाराम महाराज आजोळ ट्रस्टच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व ढोल-ताशा पथकांचे खेळ आयोजित केले होते. यात सहभागी असणाऱ्या ढोल लेझिम पथकाना बक्षिसे देण्यात आली. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भव्य जंगी कुस्तीचा आखाडा भरविण्यात आला. मुख्य लढतीस जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज केसरी हा किताब व मानाची गदा आणि रोख बक्षिस देण्यात आले. कै. विष्णू तात्याबा खांदवे यांच्या स्मरणार्थ खांदवे कुटुंबीयांकडून मानाची गदा देण्यात आली. महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी या कुस्तीच्या आखाड्यात आपला सहभाग नोंदवला. माजी आमदार बापूसाहेब पठारे, जगदीश मुळीक, माजी उपसरपंच प्रितम खांदवे, सुनिल खांदवे, संतोष खांदवे, प्रमोद काळे, मोहन शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.