लोकमान्य हास्ययोग संघातर्फे रौप्य महोत्सवी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकमान्य हास्ययोग संघातर्फे रौप्य महोत्सवी कार्यक्रम
लोकमान्य हास्ययोग संघातर्फे रौप्य महोत्सवी कार्यक्रम

लोकमान्य हास्ययोग संघातर्फे रौप्य महोत्सवी कार्यक्रम

sakal_logo
By

लोकमान्य हास्ययोग संघातर्फे रौप्य महोत्सवी कार्यक्रम

पुणे, ता. ः लोकमान्य हास्य योग संघाच्या ‘हास्यलोक’ मुखपत्राच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेषांक व संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष देसाई यांच्यावरील विशेष पुस्तकाचे प्रकाशन, प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी (ता. २८) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत कोथरूड येथील आशिष गार्डन मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व कार्यकारी संचालक डॉ. प्रमोद चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते दिलीप वेडे पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील अशी माहिती संघाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद आंबीकर यांनी दिली. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ निवेदक  सुधीर गाडगीळ व विनया देसाई यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बंडोपंत फडके, सचिव पुष्पा भगत, खजिनदार जयंत मुळे उपस्थित होते.