Wed, May 31, 2023

विद्यापीठात शहीद दिनानिमित्त अभिवादन
विद्यापीठात शहीद दिनानिमित्त अभिवादन
Published on : 23 March 2023, 10:10 am
पुणे, ता. २३ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शहीद दिनानिमित्त गुरुवारी (ता.२३) भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अधिष्ठाता डॉ. विजय खरे, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र, आजीवन अध्ययन व अध्यापन केंद्राचे संचालक डॉ. विलास आढाव, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, मुकुंद पांडे आदी उपस्थित होते.