Thur, June 1, 2023

राहुल गांधी शिक्षा निषेध
राहुल गांधी शिक्षा निषेध
Published on : 23 March 2023, 1:58 am
पुणे, ता. २३ ः देशातील मूलभूत प्रश्नांवर व देशाची सार्वजनिक संपत्ती उद्योगपतींच्या घशात घालण्याला विरोध करत असल्यामुळे राहुल गांधी यांना कट करून दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याचा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी गुरुवारी केला. संसदेत संविधानिक मार्गाने काँग्रेस नेते राहुल यांना रोखू शकत नसल्यामुळेच मोदी-शहांच्या सरकारने गुजरातमध्ये हे घडवून आणल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. मात्र सरकारच्या निती व धोरणांवर टीका करण्याचा संविधानाने दिलेला अधिकार अबाधित राहील व यातून कोणत्याही समाजास दुखावण्याचा हेतू नव्हता, हेदेखील स्पष्ट होईल, असेही तिवारी यांनी सांगितले.