जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने वार
जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने वार

जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने वार

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : जुन्या वादातून टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. यात तरुणाच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. ही घटना कात्रज येथील सुखसागरनगर परिसरात घडली.
अखिलेश ऊर्फ लाडाप्पा कलशेट्टी (वय २२, रा. कात्रज) असे जखमीचे नाव आहे. याबाबत अभिजित सुरेश दुधनीकर (वय २३, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) याने फिर्याद दिली. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तीन अल्पवयीन मुलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी निखिल गोरख दिनकर (वय १९, रा. गोकुळनगर, कात्रज) याला अटक केली आहे. तर, अन्य तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अभिजित आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. याबाबत अभिजितने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर अभिजित आणि त्याचा मित्र अखिलेश हे दोघेजण मंगळवारी साडेचारच्या सुमारास दुचाकीवरून सुखसागरनगर परिसरातून जात होते. त्या वेळी आरोपींनी खंडोबा मंदिराजवळ दोघांना अडवून मारहाण केली. तसेच, अखिलेश याच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हत्याराने वार केला. परंतु त्याने तो वार हातावर घेतल्यामुळे त्याच्या हाताला गंभीर जखम झाली आहे.