जवानांच्या कुटुंबीयांनी घेतला गायन-नृत्याविष्काराचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जवानांच्या कुटुंबीयांनी घेतला
गायन-नृत्याविष्काराचा आनंद
जवानांच्या कुटुंबीयांनी घेतला गायन-नृत्याविष्काराचा आनंद

जवानांच्या कुटुंबीयांनी घेतला गायन-नृत्याविष्काराचा आनंद

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : स्त्री आणि निसर्गातील नवनिर्मिती करण्याच्या सामर्थ्याला सलाम करणारा गायन-नृत्यावर आधारित सांगीतिक कार्यक्रम पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. जवानांच्या कुटुंबीयांसाठी विशेषत्वाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. माणिक मंत्री-आजगावकर यांच्या ‌‘एकतारी’ संस्थेतर्फे ‌‘नाद-रंग’ या गायन-नृत्याच्या मैफलीचे आयोजन केले होते. कार्यक्रम सदर्न कमांडमधील चरक सभागृहात झाला. कलाकारांनी सादर केलेल्या गीतांना आणि नृत्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यामध्ये अंजली शिंगडे-राव यांचे सोलो व्हायोलिन वादनही झाले. पं. शरद सुतवणे यांचे पुत्र मनोज सुतवणे (गायन-हार्मोनिअम), वर्षा जोशी (गायन), अनिरुद्ध देवकर (गायन) तर साथसंगत शिवानी देशपांडे (तबला), अभय इंगळे (ऑक्टोपॅड, बासरी), अमन सय्यद (की-बोर्ड) यांची होती. नीरजा आपटे यांनी निवेदन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध कथक नृत्यांगना, अभिनेत्री शर्वरी जमेनीस आणि सहकलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला.