पुणे शहर, परिसरात आज पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे शहर, परिसरात 
आज पावसाची शक्यता
पुणे शहर, परिसरात आज पावसाची शक्यता

पुणे शहर, परिसरात आज पावसाची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः उन्हाच्या तीव्र झळा असहाय्य होत असताना शहरात रविवारी (ता. ४) पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा पसरला होता. पुढील चार दिवस शहर व परिसरात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असून सोमवारी (ता. ५) शहरात पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

गेल्या आठवडाभरात शहरात ऊन-पावसाची स्थिती कायम असताना शनिवारी (ता. ३) मात्र दिवसभर उन्हाचे चित्र कायम होते. रविवारी दिवसभर शहरात ऊन-सावलीची स्थिती असताना दुपारी पावसाच्या जोरदार सरींनी शहरात हजेरी लावली. शहरात १३.३ मिलिमीटर इतका पाऊस पडला. तर कमाल तापमानातही काहीशी घट झाली होती. शहरासह उपनगरांमध्येही पावसाची नोंद झाली. पूर्वमोसमी पावसाच्‍या हजेरीमुळे उन्हाच्या तापापासून नागरिकांची काहीशी सुटका झाली होती. दरम्‍यान, येत्या गुरुवारपर्यंत (ता. ४) पुणे व परिसरात अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती अशीच राहण्याचा अंदाज आहे.

पुणे व परिसरात झालेला पाऊस (मिमी) -
पुणे शहर - १३.३
पाषाण - ८.५
चिंचवड - ७.५
मगरपट्टा - ८.५
हडपसर - २०
कोरेगाव पार्क - ३