Migration
MigrationSakal

Village Migration : पुणे जिल्ह्यातील अतिधोकादायक गावांचे स्थलांतर रखडले

पुणे जिल्ह्यातील धोकादायक २३ गावांपैकी अतिधोकादायक तीन गावांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील धोकादायक २३ गावांपैकी अतिधोकादायक तीन गावांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. मात्र,अडीच वर्षानंतरही राज्य सरकारकडून त्यावर कोणत्याही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या गावांतील नागरिकांचे प्राधान्याने कायमस्वरूपी स्थलांतर करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

Migration
Baramati News : बारामतीतील डॉक्टर देवदूत बनून आले आणि रुग्णाचे प्राण वाचले...

पावसाळा पूर्व तयारीचा मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकताच आढावा घेतला. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी ही मागणी केली. आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील धोकादायक गावांचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए), भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या सरकारी यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये २३ गावे धोकादायक तर तीन गावे अतिधोकादायक असल्याचे दिसून आले.

तेव्हा भोर तालुक्यातील धानवली आणि कोंढरी, तर मुळशी तालुक्यातील घुटके या तीन गावांचे सर्वेक्षण केल्यानंतर येथील स्थानिकांचे तत्काळ पुनर्वसन करण्याचा अहवाल २०१९ मध्ये जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. मात्र, अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही राज्य सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

Migration
Accident : वाघोलीत होर्डिंगस् मुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरूच; दुचाकीधारक दाम्पत्य जखमी

भोर तालुक्यातील दोन्ही गावे डोंगराळ असून येथील जमिनीचा पृष्ठभाग खडकाळ आणि लाल मातीचा आहे. तसेच पावसाळ्यात धानवली गावात तब्बल सात हजार मिलिमीटर, तर कोंढरी गावात आठ हजार मि.मी. पाऊस पडतो. तसेच डोंगरांना भेगा पडल्या असून रायरेश्वर किल्ल्यालगतच्या डोंगरावरून खाली येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात अडथळे येत आहेत. त्यामुळे या दोन्ही गावांना धोका असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तात्पुरते स्थलांतर

मुळशीतील घुटके गावाची स्थितीही अशीच आहे. या गावात गेल्या वर्षी पावसानंतर लोकवस्तीवरील डोंगरात जमिनीला एक फुटाची भेग पडल्याचे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले होते. त्यानंतर भूवैज्ञानिकांनी तत्काळ येथे भेट देऊन पाहणी केली होती. त्यात मूळ ठिकाणाहून जमीन सरकल्याचे आढळून आले.

तसेच पावसादरम्यान या भेगांमधून पावसाचे पाणी पाझरून जमिनीखाली कठीण खडकावरून आणि घरांच्या पायाखालून वाहत असल्याचेही निदर्शनास आले. ही बाब लोकवस्तीला धोकादायक असल्याने गेल्या आणि चालू वर्षी तेथील कुटुंबांना तात्पुरते स्थलांतरित केले होते.

पावसाळा पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील धोकादायक गावांमधील उपाययोजना करण्याबाबत आणि अतिधोकादायक तीन गावांतील नागरिकांचे स्थलांतर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर तातडीने याबाबत कार्यवाही पूर्ण करू.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com