सी-२० ग्लोबल सीड 
बॉल प्रकल्पाचा प्रारंभ

सी-२० ग्लोबल सीड बॉल प्रकल्पाचा प्रारंभ

पुणे, ता. ६ ः पर्यावरणीय शाश्वततेला चालना देण्यासाठी आणि जैवविविधतेबाबत जागरुकता वाढवण्याच्या उद्देशाने माता अमृतानंदमयी मठाच्या युवा शाखा आयुधच्या वतीने अनोख्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. ‘सिव्हिल-२० (सी-२०) ग्लोबल सीड बॉल’ मोहिमेअंतर्गत पुण्यात दीड महिन्यांच्या कालावधीत पाच लाख सीड बॉल संकलन करण्यात येणार आहे. ही मोहीम वन विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

सी-२० संकल्पनेची सुरुवात एप्रिलमध्ये माता अमृतानंदमयी देवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. त्‍यास आता पुण्यात ही राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या उद्‍घाटनाप्रसंगी डॉ. संतोष बिकुलाल चव्हाण, टी. पी विजयन, इरफान मुलाणी आदी उपस्थित होते. या वेळी सीड बॉल बनविण्याची कार्यशाळा पार पडली. दरम्यान आयुधतर्फे २५० शाळा, विद्यापीठे, संस्था आणि सोसाट्यांमध्ये सीडबॉल कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहे. शाश्र्वत आणि संतुलित पर्यावरणाच्‍या अनुषंगाने या मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढविणे, सीड बॉल निर्मितीच्या या उपक्रमासाठी त्यांनी प्रोत्साहित करण्याचा मुख्य उद्देश असेल. या वेळी डॉ. चव्हाण म्हणाले, ‘‘वनीकरणामुळे मातीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होऊ शकते. समाजात कर्करोगाचे रुग्ण वाढत असून या समस्यांवर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे निसर्गाचे संवर्धन आणि वृक्षारोपण करणे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com