ड्रोनद्वारे फवारणीबाबत राज्यस्तरीय कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रोनद्वारे फवारणीबाबत राज्यस्तरीय कार्यशाळा
ड्रोनद्वारे फवारणीबाबत राज्यस्तरीय कार्यशाळा

ड्रोनद्वारे फवारणीबाबत राज्यस्तरीय कार्यशाळा

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे फवारणी अधिक प्रभावीपणे करणे शक्य होते. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी राज्यस्तरीय कार्यशाळा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व एसआयआयएलसी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ११) आयोजिली आहे.
या कार्यशाळेचे उद्‍घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेमध्ये ड्रोनची ओळख, प्रकार, शेतीत वापर, फवारणीसाठी वापर, फायदे, नियम, ड्रोनचे विविध घटक, कार्यप्रणाली, ड्रोनने फवारणीसाठी मान्यताप्राप्त रासायनिक द्रावणे, ड्रोनच्या साहाय्याने कीटकनाशके, खते फवारणीसाठीची मानके, फवारणी ड्रोनच्या प्रसारासाठी शासनाचे विविध उपक्रम अशा अनेक बाबींसंदर्भात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, शास्त्रज्ञ डॉ. सचिन नलावडे, डॉ. सी. एस. पाटील, डॉ. शिरीषकुमार भणगे, डॉ. मुकुंद शिंदे, इंजिनिअर निळकंठ मोरे इ. तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क १२०० रुपये. आगाऊ नावनोंदणी आवश्यक आहे.

परसबागेला बनवा
न्यूट्रिशनल किचन गार्डन
किचन गार्डन प्रकारात टेरेस, बाल्कनी, उभ्या भिंती, घराच्या आतील रिकाम्या जागेत भाजीपाला घेणे शक्य आहे. किचन गार्डन हे फक्त भाजीपाला पुरवणारे गार्डन नसून आपल्या आरोग्याला सांभाळणारे न्यूट्रिशनल गार्डन बनू शकते. याद्वारे भाजीपाला, सक्युलंन्ट्स व कॅक्टस, फॉलिएज व फुलझाडे उत्पादन ते हायड्रोपोनिक अर्थात माती विरहित पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला उत्पादनाचे मार्गदर्शन करणारे प्रमाणपत्र प्रशिक्षण शनिवारी (ता. १०) व रविवारी (ता. ११) आयोजिले आहे. टेरेस गार्डन, बाल्कनी गार्डन, इनडोअर भाजीपाला गार्डन, आउटडोअर भाजीपाला गार्डन, जनरल किचन गार्डन इ. प्रकार, टेरेस वा घराजवळील जागेत भाजीपाल्याशिवाय हंगामी कोणकोणती फुलझाडे व शोभेची झाडे आपण लागवड करू शकतो, त्यासाठीचे नियोजन, माती व कुंड्या भरण्याची पद्धती तसेच अन्नद्रव्य आणि रोग-कीड नियंत्रण, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, एक्वापोनिक्स इ. विषयी मार्गदर्शन होईल. प्रशिक्षणार्थींना व्हेजिटेबल स्टार्टर सीड कीट दिली जाणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४००० रुपये. आगाऊ नावनोंदणी केल्यास १००० रुपये सवलत मिळेल.

ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.
नोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२