वेगवेगळ्या आजारांवरील १४ औषधांवर बंदी

वेगवेगळ्या आजारांवरील १४ औषधांवर बंदी

पुणे, ता. ६ : वेदनाशामक, खोकला अशा वेगवेगळ्या आजारांवरील १४ औषधे आणि त्यांच्या मिश्रणांची विक्री करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली. ही औषधे आता बाजारातून परत मागवून घेण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केल्या आहेत.
खोकला, काही आजारांवरील प्रतिजैविके, वेदनाशामक यावरील वेगवेगळ्या घटकांचे मिश्रण असलेल्या औषधांचा यात समावेश आहे. गेल्या काही वर्षांत मिश्रण असलेल्या सुमारे एक हजार ८०० औषधांची तपासणी करण्यात आली होती. त्यासाठी स्वतंत्र तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यापैकी २०० औषधे बंद करण्याची शिफारस यापूर्वीच समितीने केंद्र सरकारला केली होती. त्यातील काही औषधे याआधीच बंद झाली आहेत. मात्र त्यातील वेगवेगळ्या आजारावरील १४ औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे या औषधांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्या आधारावर केंद्र सरकारने ही औषधे आणि त्यांचे मिश्रण बंद करण्याचा निर्णय घेतला.
याबाबत ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे म्हणाले, ‘‘बंदी येईपर्यंत ही औषधे बाजारपेठेत वितरित झालेली असतात. त्यामुळे बंदीचे आदेश आल्यापासून तातडीने या औषधांची खरेदी-विक्री थांबविण्याच्या सूचना संस्थेच्या सदस्यांना देण्यात आल्या आहेत. सरकारने विक्रीसाठी बंदी घातलेल्या औषधांची विक्री करू नये. तसेच अशा औषधांचा साठा किरकोळ औषध दुकानदारांनी परत घाऊक विक्रेत्यांकडे द्यावा. ही औषधे संबंधित कंपनीकडे पाठवावी, अशा सूचना राज्यातील औषध विक्रेत्यांना करण्यात आली.’’

वेगवेगळ्या १४ औषधांच्या विक्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या औषधांची बाजारपेठेत विक्री करू नये, अशा सूचना सर्व औषध विक्रेते आणि वितरकांना देण्यात आल्या आहेत. याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. ही औषधे बाजारातून परत मागवून घेण्यात येत आहेत.
- श्याम प्रतापवार, सहआयुक्त (औषध), पुणे विभाग

बंदी घातलेल्या औषधांची मिश्रणे
- निमेसुलाइड आणि पेरासिटेमोल
- एमोक्सोलीन आणि ब्रोमहेक्सीन
- फोल्कडाइन आणि प्रोमेथेजीन
- क्लोरोफेनिरेमाइन, डीक्ट्रोमेथोरफेन, गुयाफेनेसिन, अमोनियम क्लोराइड आणि मेन्थोल
- क्लोरोफेनिरेमाइन मेलिएट आणि कोडिन सिरप
- अमोनियम क्लोराइड, ब्रोमहेक्सीन आणि डीक्ट्रोमेथोरफेन
- ब्रोमहेक्सीन, डीक्ट्रोमेथोरफेन, अमोनियम क्लोराइड आणि मेन्थोल
- डीक्ट्रोमेथोरफेन, क्लोरोफेनिरेमाइन, गुयाफेनेसि आणि अमोनियम क्लोराइड
- पेरासिटेमोल, ब्रोमहेक्सीन, फेनइलफराइन, क्लोरोफेनिरेमाइन आणि गुयाफेनेसिन
- सेलबुटामोल आणि ब्रोमहेक्सीन
- क्लोरोफेनिरेमाइन, कोडीन फोस्फेट आणि मेन्थोल सिरप
- फिनटोएन आणि फिनोबार्बीटोन सोडियम
- अमोनियम क्लोराइड, सोडियम साइट्रेट, क्लोरोफेनिरेमाइन मेलेट आणि मेन्थोल
- सब्लुटामोल, हाइड्रोक्सीथाइलथियोफिललाइन आणि ब्रोमहेक्सीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com