खडकीतील रेल्वे भूयारी मार्गासाठी २५ कोटी

खडकीतील रेल्वे भूयारी मार्गासाठी २५ कोटी

पुणे महापालिका रेल्वेला निधी देणार
पुणे, ता. ६ : खडकी येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वे भुयारी मार्गांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाला २५ कोटी रुपये देण्याची तयारी पुणे महापालिकेने दाखविली आहे. खडकी पोलिस ठाणे आणि बोपोडी येथे रेल्वे मार्गाच्या खालून जाण्यासाठी दोन भुयारी मार्ग आहे. पण रुंदी खूप कमी असल्याने कायम वाहतूक कोंडी होते. औंध, बोपोडी, खडकी, येरवडा या भागांतील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या दोन्ही भुयारी मार्गांचे रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावावर खडकी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com