विद्येच्या प्रांगणात

विद्येच्या प्रांगणात
Published on

ज्यूदो स्पर्धेत संस्कृती कडू हिला रौप्यपदक
पुणे : नोएडा येथे झालेल्या सीबीएसई राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत श्री श्री रविशंकर विद्या मंदिरमध्ये (भूगाव) आठवीमध्ये शिकणारी संस्कृती कडू हिला रौप्यपदक मिळाले आहे. स्पर्धेत देशातील सर्व राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते. तसेच दुबईमधील शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात तिने हे पदक प्राप्त केले आहे. किर्स्टल क्लब आणि दयानंद यांच्याकडे ती सराव करते.

रमणबाग शाळेत संविधान दिन साजरा
पुणे : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत संविधान दिनानिमित्त ‘भारतीय संविधान’ पुस्तकाचे पूजन झाले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा मिनोचा, पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, जयंत टोले, उषादेवी भोसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक मोहन शेटे यांनी ‘भारतीय संविधान’ विषयावर व्याख्यान दिले. चंद्रशेखर कोष्टी यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना संविधानाची तत्त्वे आचरणात आणण्याबाबत प्रतिज्ञा दिली. महेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

नूमवि मुलींच्या प्रशालेत संविधान दिन साजरा
पुणे : शिक्षण प्रसारक मंडळीची नू. म. वि. मुलींची प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका संगीता कांबळे, पर्यवेक्षिका वर्षा गुमास्ते यांनी संविधानाच्या प्रतिमेचे पूजन केले. सर्व विद्यार्थिनी, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सामूहिकरीत्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावर्षी प्रशालेतील सातवी आणि आठवीच्या १५२ विद्यार्थिनी संविधान गुणगौरव परीक्षेत सहभागी झालेल्या आहेत. अंजली जोगळेकर, मृणालिनी शिंदे, विनया पानसरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. नीता मदने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये संगीत स्पर्धा
पुणे : आंबेगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘आंतर पोदार संगीत स्पर्धे’चे आयोजन केले. या वेळी शाळेचे व्यवस्थापक बेंजामिन फ्रँकलिन, प्राचार्या अनघा घोलप यांच्यासह पोदार शाळेच्या विविध शाखांतील मुख्याध्यापक उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण गायिका शुभदा आठवले, गायक राजेश दातार यांनी केले. स्पर्धेत पोदार शाळांच्या नऊ शाखांमधून ३६ स्पर्धक सहभागी झाले होते. सर्वाधिक पारितोषिके मिळविणाऱ्या आंबेगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलला संगीतातील ‘उत्कृष्ट शाळे’चा पुरस्कार देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com