ऑनलाइन वीजबिल भरणा पुणे दुसऱ्या क्रमांकावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाइन वीजबिल भरणा 
पुणे दुसऱ्या क्रमांकावर
ऑनलाइन वीजबिल भरणा पुणे दुसऱ्या क्रमांकावर

ऑनलाइन वीजबिल भरणा पुणे दुसऱ्या क्रमांकावर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १ : राज्यात ऑनलाइन वीजबिल भरणा करण्यात कोकण प्रादेशिक विभागाने प्रथम क्रमांक पटकविला आहे. तर त्या पाठोपाठ प्रादेशिक कार्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला असल्याचे समोर आले आहे.
वीजबिल भरणा केंद्रांवर जाण्याऐवजी घरबसल्या बिल करण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी ११ लाख ५३ हजार ७०३ लघुदाब ग्राहकांनी गेल्या महिन्यात ऑनलाइन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. या ग्राहकांकडून वीजबिलाच्या भरण्यापोटी एकूण दोन हजार २३० कोटी सहा लाख इतकी रक्कम भरली आहे. प्रत्येक ग्राहकाला ऑनलाइन पेमेंटवर ०.२५ टक्के सवलत मिळत त्यामुळे ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

हे लक्षात ठेवा
- वीज ग्राहक संगणक किंवा मोबाईल ॲपच्या मदतीने वीजबिल भरू शकतात
- ग्राहकांचा वेळेत बचत होत होऊन वेळेवर बिलाचा भरणा होतो
- ग्राहकांना महावितरणच्या मोबाईल ॲप किंवा संकेतस्थळावर चालू किंवा थकबाकीची देयके पाहण्याची सुविधा उपलब्ध - डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा
- ऑनलाइन वीजबिल भरल्यास संगणकीकृत पावतीही ग्राहकाला मिळते
- महावितरणचे मोबाईल ॲप्लिकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत असून ही सेवा २४ तास उपलब्ध

कोकण प्रादेशिक विभाग आघाडीवर
ऑनलइन वीजबिल भरणा करण्यात कोकण प्रादेशिक विभागाचे ग्राहक आघाडीवर असून एकूण ४९ लाख २१ हजार ६९३ ग्राहकांनी एक हजार एक कोटी १२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर या खालोखाल पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या ३३ लाख ७५ हजार ४७१ ग्राहकांनी ७५१ कोटी ८५ लाख इतका, नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या १९ लाख ३३ हजार २५६ ग्राहकांनी २९९ कोटी १५ लाख इतका भरणा केला आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या नऊ लाख २३ हजार २८३ इतक्या ग्राहकांनी १७७ कोटी ९६ लाख इतका ऑनलाइन भरणा केला आहे.