शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच लागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच लागणार
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच लागणार

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच लागणार

sakal_logo
By

पुणे, ता. १ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या परीक्षेच्या अंतिम निकाल तयार करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या आठवड्यात हा अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण राज्यात ३१ जुलै रोजी घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीची (२०२१ मधील) शिष्यवृत्ती परीक्षा लांबली होती आणि ती परीक्षा १२ ऑगस्ट २०२१ मध्ये झाली होती. तर यंदा फेब्रुवारी-२०२२ मध्ये होणे अपेक्षित होती, तरी देखील ही परीक्षा अखेर जुलैमध्ये घेण्यात आली. आता २०२३ मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण होत आली आहे. मात्र, तरीही जुलै २०२२ मध्ये घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकालासाठी लाखो विद्यार्थी, पालक, शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
जुलै २०२२ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा झाल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी या परीक्षेची अंतरिम तात्पुरती उत्तरसूची जाहीर केली. त्यानंतर २० सष्टेंबर रोजी अंतिम उत्तरसूची परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. तर परीक्षेचा अंतरिम निकाल ७ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. अंतरिम निकालानुसार गुणपडताळणी करून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या माहितीत दुरुस्ती करण्यासाठी मुदत दिली होती. यानंतर आवश्यक ते बदल, दुरुस्ती करून आता अंतिम निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिक्षा परिषदेतर्फे अंतिम निकाल लावण्याची संपूर्ण तयारी झाली असून येत्या काही दिवसांत हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची सांख्यिकीय माहिती :
एकूण शाळा : ४८,०८३
विद्यार्थी संख्या : ७,२१,८६६
पाचवी : ४,१८,०५२
सहावी : ३,०३,८१४