‘ईव्ही टेक्नॉलॉजी डे’निमित्त परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ईव्ही टेक्नॉलॉजी डे’निमित्त परिषद
‘ईव्ही टेक्नॉलॉजी डे’निमित्त परिषद

‘ईव्ही टेक्नॉलॉजी डे’निमित्त परिषद

sakal_logo
By

पुणे, ता. ः इलेक्ट्रिक वाहन उद्योग झपाट्याने वाढत आहे. भारतात या उद्योगाला मोठ्या संधी आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत ई-व्हेईकल उपलब्ध होणे काळाची गरज आहे. ‘ईव्ही’ची कार्यक्षमता, सुरक्षितता वाढवण्यासाठी संशोधन व प्रगत तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असा सूर एका परिषदेत उमटला. टेक फोरम संस्थेच्या वतीने ‘ईव्ही टेक्नॉलॉजी डे’निमित्त नुकतेच एकदिवसीय परिषद व चर्चासत्राचे आयोजन केले होते. येरवड्यातील क्रिएटिसिटी (ईशान्य मॉल) येथे आयोजित विसाव्या पुणे ऑटो एक्स्पोमध्ये दिवसभर ११ सत्रात तज्ज्ञांनी या विषयावर मंथन केले. एकूण ८० जणांनी यात सहभाग नोंदवला. यामध्ये डॉ. यशोधन गोखले, हेमंत पाध्ये, अभय फणशीकर, सचिन वाघ, प्रमोद चौधरी, डॉ. मारुती खैरे, आशुतोष पटवर्धन, शिरीष कुलकर्णी, काजल राजवैद्य, अनिरुद्ध बर्वे, डॉ. मनोज मोदाणी, अभय पटवर्धन, काजल राजवैद्य, विवेक सहस्रबुद्धे, अनंत भेडसगावकर, अद्वैत गोखले, जयवंत महाजन, विक्रांत वैद्य, राजीव रणदिवे, मकरंद पारखी आदी तज्ज्ञांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केले.