अनिल भोसले यांचा तात्पुरता जामीन नामंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल भोसले यांचा 
तात्पुरता जामीन नामंजूर
अनिल भोसले यांचा तात्पुरता जामीन नामंजूर

अनिल भोसले यांचा तात्पुरता जामीन नामंजूर

sakal_logo
By

पुणे, ता. २ : शिवाजीराव भोसले बँक प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार अनिल भोसले यांनी उपचारांसाठी केलेला तात्पुरत्या जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी हा आदेश दिला.

आमदार भोसले यांनी त्यांना होणाऱ्या किडनीच्या आजारांचे उपचार ससून रुग्णालयात उपलब्ध नाहीत. ते उपचार केवळ रूबी आणि पूना हॉस्पिटल येथेच होत आहेत. तसेच प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तात्पुरता जामिन मिळावा, असा अर्ज केला होता. या अर्जास सरकारी वकील विलास पठारे यांनी विरोध केला. मूळ फिर्यादी व गुंतवणूकदारांचे वकील सागर कोठारी याबाबत कामकाज पाहिले. भोसले एकाच वेळी उच्च न्यायालय मुंबई आणि विशेष न्यायालय पुणे येथे जामिनाचा अर्ज करून दोन्ही न्यायालयापुढे माहिती लपवून न्यायालयाची फसवणूक करीत असल्याचे ॲड. कोठरी यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच ससून रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय अहवालाबाबत आक्षेप घेतल्याने न्यायालयाने ही बाब ग्राह्य धरीत ससूनने दिलेल्या अहवालाबाबतदेखील प्रश्नार्थक मत नोंदविले. तसेच या प्रकरणात भोसले यांची पत्नी रेश्मा भोसले अजून फरार आहे आणि इतर बारा आरोपींना अद्याप अटक नाही, या बाबी न्यायालयाने त्यांच्या निरीक्षणात नमूद केल्या आहेत. भोसले यांना उपचाराकरिता जामिनावर सोडण्याची गरज नसून, नियमानुसार सरकारी किंवा खासगी रूग्णालयात उपचार घेऊ शकतात, असा युक्तिवाद ॲड. पठारे यांनी केला.