अभियांत्रिकीच्या चार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियांत्रिकीच्या चार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
अभियांत्रिकीच्या चार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

अभियांत्रिकीच्या चार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

sakal_logo
By

पुणे, ता. २ : चाकण एमआयडीसी परिसरातील फ्लुइड कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या चार गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना (दोन मुली व दोन मुलगे) एकूण चार लाख रुपयांची शिष्यवृत्ती सकाळ माध्यम समूहाच्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून प्रदान करण्यात आली. या प्रसंगी फ्लुइड कंट्रोल्स प्रा. लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानसेन चौधरी, पल्लवी चौधरी, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, सीओईपीचे सहयोगी अधिष्ठाता व विद्यार्थी उपक्रमप्रमुख डॉ. पी. आर. धामणगावकर व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी उपस्थित होते.
शिष्यवृत्तीसाठी द्वितीय वर्षाच्या निखिल कोकाळे (कॉम्प्युटर शाखा), श्वेतगौरी जाधव (सिव्हिल शाखा), अभिषेक काकडे (कॉम्प्युटर शाखा), वैष्णवी पाटील (सिव्हिल शाखा) या विद्यार्थ्यांची प्रथम वर्षाची शैक्षणिक प्रगती तपासून निवड करण्यात आली. मागील वर्षीही चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली होती. फाउंडेशनच्या माध्यमातून १९५९ पासून गुणवंत व आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी व संशोधनासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. प्रामुख्याने परदेशात उच्चशिक्षणासाठी व संशोधनासाठी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली जाते. फ्लुईड कंट्रोल्स प्रा. लिमिटेड ही आस्थापना १९७४ पासून कार्यरत असून, कंपनीस मागील तीन वर्षांत सीआयआयतर्फे उत्कृष्ट इनोव्हेशन, उत्कृष्ट ब्रँडिंग व इतर इंडस्ट्रीयल पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कंपनीचे अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान असते.

शिवाजीनगर : ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करताना विद्यार्थ्यांसमवेत (मागील रांगेत डावीकडून) पल्लवी चौधरी, डॉ. तानसेन चौधरी, महेंद्र पिसाळ, डॉ. पी. आर. धामणगावकर.
PNE23T15586
PNE23T15747