मराठवाडा आणि विदर्भात वाढणार थंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठवाडा आणि विदर्भात वाढणार थंडी
मराठवाडा आणि विदर्भात वाढणार थंडी

मराठवाडा आणि विदर्भात वाढणार थंडी

sakal_logo
By

पुणे, ता. २ : महाराष्ट्रात गारठा पुन्हा वाढला आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट होत असल्याने थंडीत ही वाढ होत आहे. जानेवारी महिन्याची स्थिती पाहता मराठवाडा आणि विदर्भात तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याने थंडीत वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नुकतेच जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील अंदाज जाहीर केले आहे. त्यानुसार यंदा जानेवारी महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका जाणवणार आहे. मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरी राहणार असून कोकणात मात्र गारठा कमी असेल. देशाची स्थिती पाहता जानेवारी दरम्यान वायव्य आणि पूर्व भारतातील काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या दक्षिण भारतात काही ठिकाणी किमान तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहू शकते. मात्र, ईशान्य व दक्षिण भारतातील राज्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने थंडी मात्र कमी राहणार आहे, असेही आयएमडीने नमूद केले आहे.

जानेवारी ते मार्च दरम्यानचा अंदाज
- जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित
- दक्षिण भारतासह पश्चिम किनारपट्टी व लगतच्या भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज
- उत्तर महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक, गुजरात व केरळच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस