भीमा कोरेगाव अभिवादन यात्रा आनंदात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमा कोरेगाव अभिवादन यात्रा आनंदात
भीमा कोरेगाव अभिवादन यात्रा आनंदात

भीमा कोरेगाव अभिवादन यात्रा आनंदात

sakal_logo
By

पुणे, ता. २ : कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पोलिस, जिल्हा प्रशासनासह विविध शासकीय यंत्रणांचे तब्बल १५ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळेच यंदा विक्रमी आंबेडकर अनुयायी येऊनही कार्यक्रम उत्साहात पार पडल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी आठ हजारपेक्षा अधिक पोलिस अधिकारी-कर्मचारी, ७४६ गृह रक्षक दल (होमगार्ड) आणि राज्य राखीव दलाच्या सात तुकड्या, पुणे शहरचे साडेपाच हजार, तर ग्रामीणचे २,७०६ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात होते. सीसीटीव्ही, वॉकीटॉकी, व्हिडिओ कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, १०० दुचाकीस्वार, दहा दहशतवादविरोधी पथके तैनात होती. सलग ३० तास हा बंदोबस्त तैनात होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्तंभाची सजावट, रस्त्यांची दुरुस्ती, परिसरातील जमिनीचे सपाटीकरण, वाहनतळ तयार केले होते. जिल्हा परिषदेकडून रात्रीतून ८० घंटागाड्यांच्या माध्यमातून तीन टन ओला आणि आठ टन कोरडा कचरा संकलित करण्यात आला. १७५ ठिकाणी तात्पुरत्या कचराकुंड्या उभारण्यात आल्या होत्या. त्यासाठी २२५ स्वच्छता कर्मचारी २४ तास कार्यरत होते. तसेच स्तंभ आणि वाहनतळ परिसरातील १५०० शौचालये सातत्याने स्वच्छ ठेवण्यात आली. या ठिकाणी महिलांसाठी चेंजिंग रूम, स्तनदा मातांसाठी तीन ठिकाणी हिरकणी कक्षात ३१ महिला कर्मचारी कार्यरत होत्या. ४८ साध्या, सात कार्डियाक रुग्णवाहिका, दहा आरोग्यदूत आणि २१ पथकांकडून २७ हजार बाह्यरुग्ण, २३०० स्क्रीनिंग, ४१ संदर्भित रुग्णांची तपासणी, उपचार करण्यात आले. जिल्हा परिषदेने १५० टँकर्सची व्यवस्था केली होती, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
बीएसएनएलतर्फे पोलिस नियंत्रण कक्षासाठी इंटरनेटची व्यवस्था होती. बार्टी, समाजकल्याण, एसडीआरएफ, एनडीआरएफ संस्थांचेही सहकार्य मिळाले. महावितरणने अखंडित वीज मिळावी यासाठी विशेष पथक नियुक्त केले होते. लोणीकंद ते पेरणे पथकर नाका मार्गावर ११४० बस विविध वाहनतळांवरून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तर पुणे ते लोणीकंदसाठी पुणे रेल्वे स्थानक, मनपा भवन, पिंपरी, अपर इंदिरानगर आदी ठिकाणाहून ९० बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पीएमपीचे ८५० चालक, वाहक व पर्यवेक्षकीय कर्मचारी, २५ आगार व्यवस्थापक, अभियंते नेमण्यात आले होते. बसच्या दहा हजार फेऱ्यांद्वारे पाच लाख नागरिकांनी लाभ घेतला, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.
-----