लोगो---------चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोगो---------चुकवू नये असे काही
लोगो---------चुकवू नये असे काही

लोगो---------चुकवू नये असे काही

sakal_logo
By

१) ‘व्हायोलिन गाते तेव्हा’
‘स्वरबहार’ आणि ‘सांस्कृतिक, पुणे’ यांच्यातर्फे व्हायोलिन गुरू पं. भालचंद्र देव यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त चारुशीला गोसावी यांच्या व्हायोलिनवरील अवीट गीतांचा ‘व्हायोलिन गाते तेव्हा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मोहन पारसनीस, विनीत तिकोनकर, अमृता दिवेकर, राजेंद्र साळुंके, प्रसन्न बाम या कलावंतांचा सहभाग असून नीरजा आपटे या निवेदन करणार आहेत.
कधी ः गुरुवार (ता. ५)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ

२) ‘कॅलिडोस्कोप’
चित्रकार रुचिरा मणियार यांच्या चित्रकृतींच्या ‘कॅलिडोस्कोप - द फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक निसर्गचित्रे तसेच अमूर्त चित्रण व आध्यात्मिक अनुभूती देणारी विविध चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील.
कधी ः शुक्रवार (ता. ६) ते रविवार (ता. ८)
केव्हा ः सकाळी १०.३० ते रात्री ८.३०
कुठे ः ‘समवसरण’ ॲम्फी थिएटर, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, विधी महाविद्यालय रस्ता

३) ‘अंकोरवाट’
कंबोडिया, बाली, श्रीलंका आदी ठिकाणच्या प्राचीन बौद्ध आणि हिंदू मंदिरांच्या विविध छायाचित्रांचा समावेश असणाऱ्या ‘अंकोरवाट’ या ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्‍घाटन ज्येष्ठ पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी ‘संग्राहक श्री. दिनकर केळकर छंदवेध पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत.
कधी ः शुक्रवार (ता. ६) ते रविवार (ता. ८)
केव्हा ः सकाळी १० ते रात्री ८.३०
कुठे ः बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता

४) कुचिपुडी नृत्य कार्यक्रम
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कुचिपुडी’ या एकल नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘परिमल परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च सेंटर’ प्रस्तुत या कार्यक्रमात कासी आयसोला (अमेरिका) यांचे एकल नृत्य सादर होणार आहे.
कधी ः शनिवार (ता. ७)
केव्हा ः सायंकाळी ६ वाजता
कुठे ः सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता