राजा धनराज गिरजीमध्ये पारितोषिक वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजा धनराज गिरजीमध्ये पारितोषिक वितरण
राजा धनराज गिरजीमध्ये पारितोषिक वितरण

राजा धनराज गिरजीमध्ये पारितोषिक वितरण

sakal_logo
By

राजा धनराज गिरजीमध्ये पारितोषिक वितरण
पुणे, ता. ४ : येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या राजा धनराज गिरजी कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंदजी संचेती, तर प्रमुख पाहुणे म्हणून रा. ध. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त डॉ. मिलिंद भोई आदी उपस्थित होते.
क्रीडा, निबंध, वक्तृत्व, विविध गुणदर्शन अशा विविध प्रकारात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे व भेटवस्तू देऊन सत्कार केला. याप्रसंगी डॉ. मिलिंद भोई यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रेय मोरे यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. संतोषी येलारपूरकर यांनी केला. यावेळी अहवाल वाचन हेमंत निकुंब, सूत्रसंचालन सुजाता पाटील यांनी तर आभार अर्चना गंगाजी यांनी मानले.

ह.ब. गिरमे विद्यालयात प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे, ता. ४ : ह.ब. गिरमे विद्यालयातील नवीन प्रयोगशाळा व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नामदेव ससाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक नावीन्यपूर्ण प्रयोगाचे सादरीकरण केले, तसेच विद्यालयात रांगोळी प्रदर्शन छोटा गट व मोठा गट, चित्रकला प्रदर्शन, प्राथमिक विभागाचे हस्तकला प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शन यांचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव ससाणे, सेक्रेटरी विजयजी भुजबळ, संस्था सदस्य शामराव गोरे, प्रमोद ससाणे, विद्यालयाच्या प्राचार्या विजया शिवरकर, उपप्राचार्य विजय गोरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सीमा राठोड, शिक्षक प्रतिनिधी सविता माळी, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा स्मिता लोणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी बारबोले यांनी तर, आभार प्रदर्शन स्मिता लोणकर यांनी केले.