येरवडा परिसरात दोघांवर शस्त्राने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येरवडा परिसरात दोघांवर शस्त्राने वार
येरवडा परिसरात दोघांवर शस्त्राने वार

येरवडा परिसरात दोघांवर शस्त्राने वार

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : येरवडा परिसरात चोरट्यांनी दोघांवर शस्त्राने वार करून त्यांच्याकडील पैसे लुबाडल्याच्या दोन घटना घडल्या. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत कृष्णा रघुनाथ इंगळे (वय २४, रा. बौद्धनगर) याने फिर्याद दिली आहे. इंगळे आणि त्याचा मित्र एक जानेवारीला मध्यरात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गुंजन चौकातील बस थांब्याजवळून जात होते. त्या वेळी काही मुले रस्त्यावर गोंधळ घालत होती. त्यापैकी एकाने इंगळे याला धमकावून पैशांची मागणी केली. त्याच्या खिशात पैसे न मिळाल्यामुळे चोरट्याच्या दुसऱ्या साथीदाराने इंगळे यांच्या पोटावर चाकूने वार करून जखमी केले. यामध्ये इंगळे हा गंभीर जखमी झाला.

दुसऱ्या घटनेत विकास जयप्रकाश शहा (वय २६, रा. खराडी) हा तरुण कल्याणीनगर येथे पहाटे पावणेपाचच्या सुमारास मोबाईलवर बोलत उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी शहा याच्या डोळ्याच्या वर लोखंडी वस्तूने मारहाण केली. तसेच, शहा याचा मित्र नितीनकुमार दास याला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला. याबाबत शहा याने फिर्याद दिल्यावरून येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.