अकाउंटिंगमधील करिअर संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकाउंटिंगमधील करिअर संधी
अकाउंटिंगमधील करिअर संधी

अकाउंटिंगमधील करिअर संधी

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : बिझनेस अकाउंटिंग व टॅक्सेशन प्रशिक्षण शनिवारी (ता. ७) सुरु होत आहे. अकाउंटंट प्रोफेशनल बनण्यासाठी जी कौशल्ये आवश्यक असतात, ते सर्व या प्रशिक्षणात मिळतील. व्यावसायिक संस्था आणि उद्योगांना पेरोल व फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी अकाउंटंट लागतात. प्रशिक्षणात इंडस्ट्रिअल अकाउंटिंग, टॅली, डायरेक्ट टॅक्सेशन, जीएसटी, इन्कम टॅक्स, टीडीएस, पे-रोल कॉम्पोनन्ट्स, ईआरपी सॉफ्टवेअर यासह एमएस एक्सेल व एमआयएस रिपोर्टिंग आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ३३,९०० रुपये.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२


लोगो- एसआयआयएलसी
शेवगा उत्पादन तंत्र, निर्यात संधी
पुणे, ता. ५ : भरपूर संधी असलेल्या शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात संधींबाबत माहिती करून देणारी एक दिवसीय कार्यशाळा शनिवारी (ता. ७) आयोजिली आहे. व्यापारीदृष्ट्या व्यावसायिक दृष्टिकोनातून शेवगा लागवडीत भरपूर संधी आहेत. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन कसे घ्यावे, स्थानिक, परकीय कोणत्या बाजारपेठेत निर्यातीला संधी आहेत, शेवग्याच्या आधुनिक जातींची ओळख, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणीचे व्यवस्थापन, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, ट्रेसिबिलीटी, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम इ. संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क १५०० रुपये.

हायड्रोपोनिक तंत्राने करा
कमर्शिअल भाजीपाला शेती
व्यावसायिकदृष्ट्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, सुरवातीला पायलट बेसिसवर हा प्रयोग कसा करावा, त्यात स्वतः यशस्वी कसे व्हावे इ.सर्व बाबींविषयी इत्थंभूत मार्गदर्शन करणारे प्रमाणपत्र प्रशिक्षण २१ व २२ जानेवारी रोजी आयोजिले आहे. यामध्ये हायड्रोपोनिक काय आहे, विविध पद्धती, प्रकार, पीकनिहाय सेटअप, हायड्रोपोनिक, अन्नद्रव्ये कशी बनवावी, पाण्याचा इसी, पीएच नियंत्रण, खतांचा वापर आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे. प्रात्यक्षिक अनुभवासाठी कमर्शिअल हायड्रोपोनिक फार्मला फिल्ड व्हिजिट आयोजिली आहे. सर्व करांसहित जेवण, चहा, प्रमाणपत्र व शिवारफेरीसह प्रतिव्यक्ती शुल्क ५५०० रुपये. १३ जानेवारीपर्यंत नाव नोंदल्यास ५०० रुपये सवलत मिळेल.
वरील दोन्ही कार्यशाळांच्या नाव नोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१
कार्यशाळांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे