कॉसमॉस बॅंकेतर्फे युवकांसाठी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉसमॉस बॅंकेतर्फे युवकांसाठी स्पर्धा
कॉसमॉस बॅंकेतर्फे युवकांसाठी स्पर्धा

कॉसमॉस बॅंकेतर्फे युवकांसाठी स्पर्धा

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : स्वामी विवेकानंद जयंती (१२ जानेवारी) हा दिवस ‘युवा दिन’ म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉसमॉस बँकेतर्फे विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष सी. ए. मिलिंद काळे यांनी दिली.

तरुणांचे विचार जाणून घेण्यासाठी डिजिटलच बँकिंग व आजचा युवक’, ‘शिक्षण पद्धती व युवक’ आणि ‘करिअरमधील आव्हाने’ या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर विद्यार्थी विचार व्यक्त करू शकतात. त्यासाठी निबंधलेखन, पीपीटी प्रेझेंटेशन किंवा पथनाटय या माध्यमांचा विद्यार्थ्यांना वापर करता येईल. शहर आणि परिसरातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली असून निबंध तसेच पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण करणाऱ्या पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना व सर्वोत्कृष्ट पथनाटयासाठी रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयामध्येच नाव नोंदणी करावयाची आहे. स्पर्धेचे परिक्षण महाविद्यालयातंर्गतच होईल. या स्पर्धेच्या तपशिलाबाबत माहिती घेण्यासाठी ९८८१४७४५९१ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा sarang.sontakke@cosmosbank.in या मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन बॅंकेतर्फे करण्यात आले आहे.