आता दरमहा रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता दरमहा रोजगार मेळावा
आता दरमहा रोजगार मेळावा

आता दरमहा रोजगार मेळावा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ५ : नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमुहांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने प्रत्येक महिन्याला रोजगार मोहिम अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पहिला प्लेसमेंट ड्राईव्ह येत्या ११ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.

अशी असेल मोहिम ः
- महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह
- कंपन्यांच्या प्रतिनिधींना उमेदवारांच्या मुलाखतीसाठी पाचारण
- पात्र उमेदवारांना जागेवरच नोकरीची संधी उपलब्ध

नोंदणीसाठी संकेतस्थळ
- संधीचा लाभ घेण्यासाठी विभागाचे www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ
- नोंदणी नसल्यास प्रथम नावनोंदणी आवश्‍यक
- युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन गरजेचे
- लॉगिननंतर डॅशबोर्डमधील ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या बटनावर क्लिक करावे
- प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील ‘फस्ट प्लेसमेंट ड्राइव्ह- पुणे’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी

कागदपत्रे आवश्‍यक
उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवावा. ऑनलाइन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवारी समक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, येथे आपल्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.