पुणे ते पानिपत अभिवादन मोहिमेचा आज प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे ते पानिपत अभिवादन मोहिमेचा आज प्रारंभ
पुणे ते पानिपत अभिवादन मोहिमेचा आज प्रारंभ

पुणे ते पानिपत अभिवादन मोहिमेचा आज प्रारंभ

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः पानिपत युद्धाच्या २६१ व्या वर्षपूर्तीनिमित्ताने ‘सशक्त भारत’ समूहाने पुणे ते पानिपत दुचाकी अभिवादन मोहिमेची आखणी केली आहे. शनिवारवाड्याच्या प्रांगणातून शुक्रवारी (ता. ६) दुपारी दीड वाजता सुरू होणारी ही मोहीम २८ जानेवारीला पुण्यात परतणार आहे. यात शंभरहून अधिक तरुण-तरुणींचा सहभाग असल्याचे सशक्त भारत संकल्प समुहाचे प्रवर्तक डॉ. संदीपराज महिंद यांनी सांगितले.

मोहिमेची सुरवात होण्यापूर्वी समुहाच्यावतीने शुक्रवारी सकाळी सकाळी ११ वाजता ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत जागरण सभा होणार आहे. त्यास संतसाहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे, विक्रम मोहिते, योगेश्वर गंधे, रेहान अब्बास, अली सरदार उपस्थित राहणार आहेत. त्यांनतर कसबा गणपतीचे दर्शन व लाल महाल येथे जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन केले जाईल. २६१ वर्षांपूर्वी मराठ्यांच्या फौजा ज्या मार्गाने गेल्या, त्या मार्गाने प्रवास करत १४ जानेवारी २०२३ ला पानिपतावर पोहचेल.


मोहीम दृष्टीक्षेपात

कालावधी ः ६ ते २८ जानेवारी
प्रवास मार्ग ः ७ राज्ये आणि ५३ जिल्हे
दर्शने ः ४४ गड कोट
एकूण मुक्काम ः २२
दुचाकी प्रवास ः २,०१८ किमी.
शौर्यज्योत घेऊन धावत प्रवास : १,५०५ किमी.
पुणे ते पानिपत अंतर ः २१३८ किमी

शनिवार वाड्यावर ‘शौर्यज्योत’

यावेळी पहिल्यांदाच पानिपत हुन पुण्याला शौर्यज्योत आणली जात आहे. ही ज्योत घेऊन काही तरुण पानिपत हुन धावत पुण्याला येतील. १४ दिवसांच्या काळात १६०० किमीचे अंतर धावत कापले जाईल. रोज किमान १३० ते १४० किमीचा पायी प्रवास होणार आहे. पुण्याला आल्यावर ही ज्योत शनिवार वाड्यावर ‘अमर ज्योती’ प्रमाणे कायमस्वरूपी प्रज्वलित राहणार आहे.