सीईओ आयुष प्रसाद रजेनंतर पुन्हा रुजू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीईओ आयुष प्रसाद
रजेनंतर पुन्हा रुजू
सीईओ आयुष प्रसाद रजेनंतर पुन्हा रुजू

सीईओ आयुष प्रसाद रजेनंतर पुन्हा रुजू

sakal_logo
By

सीईओ आयुष प्रसाद
रजेनंतर पुन्हा रुजू

पुणे, ता. ६ ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद हे प्रदीर्घ रजेनंतर शुक्रवारी (ता.६) पुन्हा रुजू झाले आहेत. जिल्हा परिषदेतील नियमित कामकाज त्यांनी सुरु केले असून शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने सोमवारपासून ते कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

नातेवाईकाला भेटण्यासाठी त्यांनी १५ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ अशी तीन आठवड्यांची रजा घेतली होती. परदेशात जाण्यासाठी त्यांनी राज्य सरकारची परवानगी घेऊन विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून अर्जित रजा मंजूर करून घेतली होती. आयुष प्रसाद यांच्या अनुपस्थितीत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे हे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते.