Thur, Feb 2, 2023

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सतर्फे दिव्यांग मुलांसोबत नववर्षाचे स्वागत
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सतर्फे दिव्यांग मुलांसोबत नववर्षाचे स्वागत
Published on : 7 January 2023, 1:20 am
पुणे, ता. ७ : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत दिव्यांग मुलांसाठी ‘जल्लोष २०२३’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते मुलांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, क्लबचे उपप्रांतपाल सुनील चेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात सुहास पाटील, सुप्रिया गायकर, दीपाली हराळे, देवाशिष सापटणेकर, चैतन्य म्हेत्रे, प्रीती सोरटे, योगेश शिंदे, जुलेखा शेख, पुष्पक सोलंकी, मुस्कान शेख, आशिष नेमाणे, दुर्गेश कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. विविध १२ संस्थांचे ३०० विद्यार्थी व शिक्षक यात सहभागी झाले होते. प्रास्ताविक सीमा दाबके यांनी केले.