Mon, Jan 30, 2023

रोटरी ॲवॉर्ड्समध्ये विद्यार्थ्यांचा गौरव
रोटरी ॲवॉर्ड्समध्ये विद्यार्थ्यांचा गौरव
Published on : 7 January 2023, 1:36 am
पुणे, ता. ७ : रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ स्पोर्ट्स सिटी इन्स्पिरा यांच्यावतीने ‘रोटरी युथ लीडरशिप ॲवॉर्ड्स’ या कार्यक्रमाचे उद्घाटन क्लबचे नियोजित प्रांतपाल शीतल शहा यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणारी कौशल्ये, वेळेचे व्यवस्थापन, शिक्षणाचे प्रशिक्षण या कार्यक्रमात देण्यात आले. यात ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी मुकेश गुप्ता, रमेश बेंद्रे, रोहिणी बन्सल, केनेडी सॅम्युएल आदी उपस्थित होते. रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ स्पोर्ट्स सिटी इन्स्पिराचे अध्यक्ष डॉ. भरत पाटील, सचिव जितेंद्र सिंग, खजिनदार अमित नागपाल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.