
सिल्क व्हिवर प्रदर्शनाचे आयोजन
पुणे, ता. ७ : विविध राज्यांमधील कॉटन व सिल्कच्या आकर्षक डिझाईनचा समावेश असणारे सिल्क व्हिवर प्रदर्शन शनिवारपासून सुरू झाले आहे. कर्वे रस्त्यावरील सोनल हॉल येथे दररोज सकाळी १०.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत ते खुले राहणार आहे.
येत्या १७ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात हॅंडलूमवर उत्कृष्ट कलाकृती केलेल्या कॉटन आणि विविध प्रांतातील सिल्क साड्या, ड्रेस मटेरिअल्स, सूट्स, कुर्ता, कुर्ती, दुप्पट्टे यासह फॅशन ज्वेलरी, गृहसजावटीचे आकर्षक उत्पादने असतील. त्यापैकी काहींवर सूट देण्यात येईल. बाजारभावापेक्षा कमी किमतीत उत्कृष्ट दर्जाची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
बिहारची भागलपुरी सिल्क, टसर सिल्क, कोसा, खादी सिल्क, उत्तर प्रदेशमधील लखनवी चिकनवर्क, कांजीवरम, म्हैसूर सिल्क पटोला, बनारसी सिल्क, मध्यप्रदेशातील माहेश्वरी सिल्क, चंदेरी, गुजरातची पटोला बांधणी, कच्छी एम्ब्रॉयडरी, राजस्थानची ब्लॉक प्रिंट व सांगनेरी प्रिंट, कर्नाटकची सिल्क साडी, बंगळूर सिल्क व प्रिंटेड क्रेप, जम्मू काश्मीरची साडी, ड्रेस मटेरिअल तसेच, आंध्रप्रदेशचे धर्मावरम, गडवाल, वेंकटगिरी, कलमकारी आणि पोचमपल्ली प्रदर्शनाची महत्ता वाढविणारी आहे. निःशुल्क प्रवेश व पार्किंगची व्यवस्था असून, प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.