स्वयंचलित सिग्नल यंत्रणेने वाचणार वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वयंचलित सिग्नल यंत्रणेने वाचणार वेळ
स्वयंचलित सिग्नल यंत्रणेने वाचणार वेळ

स्वयंचलित सिग्नल यंत्रणेने वाचणार वेळ

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नलचे (स्वयंचलित यंत्रणा) काम अंतिम टप्प्यात आले आहे. चिंचवड ते शिवाजीनगर स्थानका दरम्यान सुरु असलेले सिग्नलिंगचे काम जानेवारीच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे काम झाल्यावर शिवाजीनगर ते लोणावळा हा सेक्शन पूर्णपणे ऑटोमॅटिक सिग्नल सेक्शन होईल. त्यामुळे रेल्वे गाड्यांना मार्ग क्लिअर होण्याची गरज नाही. एकामागून एक रेल्वे धावत राहतील. परिणामी रेल्वे प्रवासाचा वेळ सात मिनिटांनी कमी होण्यास मदत होईल.
रेल्वे प्रशासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून लोणावळा ते शिवाजीनगर दरम्यान ऑटोमॅटिक सिग्नलचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत चिंचवड स्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले. चिंचवड ते शिवाजीनगरचे काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून जानेवारी अखेर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे काम आधीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र याला दिरंगाई झाली.

अशी आहे ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा :
प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर सिग्नल यंत्रणा बसविली आहे. यात हिरवा, पिवळा, आणखी एक पिवळा आणि लाल असे रंगाचे सिग्नल आहे. पूर्वी ब्लॉक सेक्शनमध्ये केवळ तीन रंगाचा वापर केला जात. शिवाय ब्लॉक सेक्शनमध्ये रेल्वेचा पूर्णपणे एफएम (फॉलोविंग मार्क) च्या पुढे जात नाही. तो पर्यंत पाठीमागून दुसऱ्या रेल्वेला सोडले जात नव्हते. या नव्या प्रणालीमध्ये मात्र तसे नाही. एका पाठीमागून रेल्वे धावतच राहतील.

असा आहे फायदा
१. प्रवासाचा वेळ वाचणार
२. एक किमीच्या अंतरावर सिग्नल असल्याने रेल्वे एका पाठीमागून एक धावत राहतील
३. मार्गाची क्षमता कमी असली तरीही जास्त गाड्यांची वाहतूक होईल
४. डबल येलो (पिवळा) असले तरीही रेल्वे धावत राहील, थांबण्याची गरज नाही

पुणे विभागात पहिल्यांदाच
पुणे विभागात पहिल्यांदाच लोणावळा-शिवाजीनगर सेक्शनमध्ये ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होत आहे. पुणे विभागातील अन्य कोणत्याही मार्गावर अशा प्रकारची यंत्रणा नाही. तसेच मध्य रेल्वे मध्ये मुंबई विभागात सर्वप्रथम ही यंत्रणा कार्यान्वित झाली. मुंबईसह पुणे व भुसावळ विभागात देखील ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

चिंचवड ते शिवाजीनगर दरम्यानचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण होताच लोणावळा - शिवाजीनगरच्या सेक्शन मध्ये रेल्वे ऑटोमॅटिक सिग्नलवर धावतील. परिणामी प्रवासाचा वेळ वाचेल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग