संस्कृत नाट्य स्पर्धा आजपासून रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृत नाट्य स्पर्धा
आजपासून रंगणार
संस्कृत नाट्य स्पर्धा आजपासून रंगणार

संस्कृत नाट्य स्पर्धा आजपासून रंगणार

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः वैविध्यपूर्ण विषयांवरील संस्कृत भाषेतील नाटकांची मेजवानी सोमवारपासून (ता. ९) रसिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेला कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रारंभ होत आहे. पाच दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण नऊ नाटके सादर होणार आहेत.
सोमवारी (ता. ९) सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने स्पर्धेची सुरुवात होईल. त्यानंतर चिंचवडच्या व्ही. के. माटे हायस्कूलचे ‘मेलनं इतिहासेन सह’ हे नाटक सादर होईल. शनिवारपर्यंत (ता. १४) ही स्पर्धा रंगणार असून दररोज सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
राज्य सरकारतर्फे हौशी रंगकर्मींना प्रोत्साहन व व्यासपीठ देण्याच्या उद्देशातून दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदाच्या वर्षी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी व बाल राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पुण्यासह राज्यातील विविध केंद्रांवर पार पडली. आता संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेला सुरुवात होत आहे. संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत सहभागींची संख्या तुलनेने कमी असल्याने विविध केंद्रांवर या स्पर्धेची थेट अंतिम फेरी घेतली जाते. त्यानुसार पुणे केंद्रावर अंतिम फेरी रंगणार असून या केंद्रावर पुणे शहर व जिल्ह्यासह सातारा, सांगली व कोल्हापूर येथील नाटके सादर होणार आहेत.