नायलॉन मांजा विक्री प्रकरणी अखेर पोलिसांना जाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नायलॉन मांजा विक्री प्रकरणी अखेर पोलिसांना जाग
नायलॉन मांजा विक्री प्रकरणी अखेर पोलिसांना जाग

नायलॉन मांजा विक्री प्रकरणी अखेर पोलिसांना जाग

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः पतंग उडविण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या नायलॉन, चायनीज व तंगुस मांजाची सर्रास विक्री होत असतानाही महापालिका व पोलिस प्रशासनाकडून विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला नव्हता. अखेर उशीराने जाग आलेल्या पोलिस प्रशासनाने खडकीत बेकायदा नायलॉन मांजा विक्रेत्याच्या दुकानावर छापा टाकून मांजा जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे.

‘तांबोळी जनरल स्टोअर्स’चा मालक अदीप अब्दुल करीम तांबोळी (रा. जुना बाजार, खडकी) असे विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनिमय १९८६ चे कलम ५ अन्वये खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संक्राती निमित्ताने पतंग उडविण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, पतंग उडविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही बंदी असलेला नायलॉन, चायनीज व तंगुस मांजाचा वापर केला जात आहे. यापुर्वी पुणे, पिंपरी चिंचवड व दौंड येथे मांजामुळे गळा कापून तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. शहरात मांजाची सर्रास विक्री होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने मागील आठवड्यात प्रसिद्ध केले होते.

तांबोळी बेकायदा नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकास मिळाली होती. त्यानंतर पथकाने दुकानावर छापा टाकून नायलॉन मांजा जप्त करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव, जयदीप पाटील, महेंद्र पवार, विनोद महाजन, स्वप्नील कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिस कारवाईला वेग येणार का?
मुंबई व पुण्यातील मांजा विक्रेत्यांकडून डिसेंबर महिन्यातच शहर व जिल्ह्याच्या विविध भागातील विक्रेत्यांना मांजाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे डिसेंबरमध्येच विक्रेत्यांवर कारवाई आवश्‍यक असते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मांजाची विक्री सुरू असते. काही विक्रेत्यांकडून छुप्या पद्धतीने मांजाची विक्री होते. पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील विक्रेत्यांची माहिती स्थानिक पोलिसांना असते, मात्र त्यांच्याकडून कारवाई होत नाही. गुन्हे शाखेकडून काही प्रमाणात कारवाई होते. या कारवाईला वेग मिळाल्यास मांजा विक्रेत्यांवर त्याचा धाक निर्माण होण्यास मदत होण्याची शक्‍यता आहे.

26 किंवा 27 डिसेंबरच्या टुडेला "मांजा''ची बातमी मेन केली आहे, ती बातमी क्रॉप करुन वापरावी.