पोदार स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोदार स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश
पोदार स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

पोदार स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

sakal_logo
By

पुणे : जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आंबेगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आर्चरी, स्केटिंग, बुद्धिबळ, बॅडमिंटन या खेळात तालुकास्तर ते जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी केली. आर्चरीमध्ये आयुष्य शिळीमकर व सिद्धी जगदाळे, स्केटिंगमध्ये अद्वैत क्षीरसागर व बुद्धिबळात प्रथम बर्डे या खेळाडूंनी विजेतेपद मिळाले. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच सीबीएसई साऊथ झोन व राष्ट्रीय अजिंक्यपद आर्चरी स्पर्धेमध्ये आयुष शिळीमकरने ७२० पैकी ६८१ गुण मिळवत ३ सुवर्णपदके पटकावली. शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा घोलप यांच्या मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना मिळाले.