स्टार्टअप्ससाठी हवी प्रेरणा, दिशा, हेतू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टार्टअप्ससाठी हवी प्रेरणा, दिशा, हेतू
स्टार्टअप्ससाठी हवी प्रेरणा, दिशा, हेतू

स्टार्टअप्ससाठी हवी प्रेरणा, दिशा, हेतू

sakal_logo
By

पुणे, ता. १० : स्टार्टअप सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे, याची संस्थापकांना स्पष्ट जाणीव असणे खूप महत्त्वाचे असते. आपले उत्पादन किंवा सेवा, आपल्या ग्राहकांच्या कोणत्या गरजा उत्तम पद्धतीने भागवतील, याची पूर्ण कल्पना संस्थापकांना असणे स्टार्टअपच्या यश-अपयशात खूप महत्त्वपूर्ण ठरते. या जाणिवेमुळेच संस्थापक करत असलेल्या कामाला प्रेरणा, दिशा आणि हेतू प्राप्त होतो. त्यामुळे ही त्रिसूत्री स्टार्टअप्ससाठी उपयोगी ठरत आहे.

ही त्रिसूत्री नेमकी काय आहे ?
प्रेरणा : आपल्या उद्दिष्टांची जाणीव आणि ग्राहकांचा फायदा याची स्पष्टता हे संस्थापकांना विविध आव्हाने किंवा अडथळ्यांना तोंड देत असताना सतत प्रेरित आणि लक्ष्य केंद्रित करण्यास मदत करू शकतात. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी दीर्घकाळ काम करावे लागणाऱ्या आणि अनेक गोष्टींचा त्याग करावा लागलेल्या संस्थापकांसाठी हे महत्त्वाचे ठरते.

दिशा-दिग्दर्शन : उद्दिष्टांची स्पष्ट जाणीव संस्थापकांना त्यांच्या यशाच्या शिखराची दिशा दाखवते आणि मार्गदर्शन करते. ही स्पष्टता त्यांना निर्णय घेण्यास त्यांच्या मूल्यांशी तडजोड न करण्याची हिंमत दृढ करण्यात आणि नवनवीन उद्दिष्टे निश्चित करण्यात मदत करू शकते. ज्यामुळे व्यवसाय अधिक परिपूर्ण आणि फायद्याचा करण्यात हातभार लागतो.

हेतू : हेतूंची भावना संस्थापकांच्या कार्याला अर्थ आणि महत्त्व देते. जे विशेषतः अनिश्चितता किंवा अडचणीच्या काळात जास्त महत्त्वपूर्ण ठरु शकते. संस्थापकांना आव्हानांना तोंड देत असतानाही, त्यांच्या कामाचे प्रयोजन आणि पूर्तता शोधण्यात मदत करू शकते.

एकंदरीत उद्देशाची-प्रयोजनाची जाणीव असणे हे स्टार्टअपच्या संस्थापकांसाठी प्रेरणा, दिशा आणि अर्थाचा एक महत्त्वाचा स्रोत असू शकतो. जे संस्थापक हीच भावना त्यांच्या टीममध्ये रुजू करतील त्यांचे यश निश्चित होते. या सर्वांचा विचार करता आंत्रप्रिनर्सला आवश्‍यक असलेले मार्गदर्शन आणि विविध सुविधा पुरवीत स्टार्टअपला बूस्टर देण्यासाठी ‘एपी ग्लोबाले’, ‘सकाळ मीडिया ग्रुप’ आणि ‘एसआयआयएलएलसी’, ‘एपीजीएल’ने पुढाकार घेतला आहे. फंडिंगपासून उत्पादनाच्या मार्केटिंगपर्यंत सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा ‘सकाळ आंत्रप्रिनर्स टॅलेंट युनिव्हर्स’ (सेतू-एसर्इटीयू) नावाचा स्टार्टअप उपक्रम या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे.

आम्ही तुमच्या स्टार्टअपला कशी मदत करू शकतो?
१) ब्रँडची जागरूकता आणि दृश्यमानता वाढविणार
२) डिजिटल आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून सेतूची जाहिरात झाल्यानंतर होणारी प्रसिद्धी
३) विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद
४) अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन आणि सल्ला
५) विविध संसाधने उपलब्ध होणार
६) इतर संस्थापकांशी संपर्कात राहण्यासाठी व्यासपीठ मिळेल
७) विचारांची देवाणघेवाण करण्यासाठीचे व्यासपीठ

तुमचे स्टार्टअप सुरवातीच्या टप्प्यात असल्यास आजच नोंदणी करा : http://setupune.com/registration/

नोंदणी करण्यासाठी क्युआर कोड स्कॅन करा....

‘सेतू’चे पहिले विनामूल्य सत्र
कधी ः २० जानेवारी २०२३
केव्हा ः संध्याकाळी ५ ते ७
कुठे ः एसआयआयएलसी मीडिया सेंटर, सकाळनगर, औंध