Sun, Jan 29, 2023

उत्कर्ष युवा प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे वितरण
उत्कर्ष युवा प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे वितरण
Published on : 10 January 2023, 1:44 am
पुणे, ता. १० ः उत्कर्ष युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे समाजभूषण पुरस्कार व मुक्ता साळवे पुरस्कार वितरण सोहळा नुकताच झाला. यावेळी ‘क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे’ पुरस्कार मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते व मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष रमेश बागवे यांना प्रदान केला. तर मुक्ता साळवे पुरस्काराने माजी नगरसेविका अश्र्विनी कदम यांना सन्मानित केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, अनिल हातगळे, मातंग एकता आंदोलन संघटनेचे समन्वयक विठ्ठलराव थोरात, राजश्री अडसूळ आदी उपस्थित होते.