...अन् केदारची दृष्टी वाचली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...अन् केदारची दृष्टी वाचली
...अन् केदारची दृष्टी वाचली

...अन् केदारची दृष्टी वाचली

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : दिवाळीमध्ये नवे कपडे घालून जेमतेम १३ वर्षांचा केदार आपल्या सोसायटीच्या आवारात फटाके वाजवत होता. काही कळायच्या आतच त्याच्या डोळ्यासमोर फटका फुटला. क्षणार्धात झालेल्या घटनेने त्याच्या नाजूक डोळ्यांना मोतीबिंदू आणि काचबिंदू झाला. गेल्या तीन महिन्यांनंतर आता त्याची दृष्टी पूर्ववत होऊ लागली आहे.
तज्ज्ञांच्या मते, काचबिंदू हा दबक्या पावलांनी येणार आजार आहे. त्याचे लवकर निदान झाल्यास तो नियंत्रित ठेवला येतो.

काय झाले?
फटक्यामुळे केदारच्या डोळ्याला मार बसला. त्यातून केदारला सुरुवातीला मोतीबिंदू झाला, त्यातून डोळ्यात असलेल्या नैसर्गिक लेन्सचा आकार वाढला. परिणामी, डोळ्यातील द्रव पदार्थ बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला. लेन्समध्ये विशिष्ट प्रथिने असतात. फटक्याने लेन्समधील प्रथिने बाहेर आले. शरीराचे संरक्षण करणाऱ्या लालपेशींना या प्रथिनांची ओळख नव्हती. त्यांच्यासाठी हा शरीराबाहेर घटक होता. त्यामुळे पांढऱ्या पेशींनी या प्रथिनांवर आक्रमण केले. त्यामुळे प्रथिनांचा आकार वाढला. त्यातूनही द्रव पदार्थ डोळ्यातच अडकले. त्यामुळे तेथे डाग पडले. त्यातून काचबिंदू झाला.

कोणता धोका होता?
आपण डोळ्यांनी जे बघतो त्याच्या संवेदना मेंदूकडे वाहून नेण्याचे कार्य करणाऱ्या ऑपक्टिक नर्व्हवरील दाब वाढला. त्यातून त्या डोळ्याने कायम स्वरुपी अंधत्व येण्याचा धोका निर्माण झाला होता. उपचार करताना केदारवर मोतीबिंदू आणि काचबिंदू अशा दोन्हीसाठी एकत्रित शस्त्रक्रिया करावी लागली.

डोळा हा अत्यंत नाजूक अवयव आहे. त्याला झालेल्या इजेमुळे लहान मुलाच्या आयुष्याला कलाटणी मिळते. त्यामुळे डोळ्यांच्या कोणत्याही दुखण्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत प्रभावी उपचार घेतले पाहिजे. केदारला ते उपचार मिळाल्याने त्याची दृष्टी वाचविणे शक्य झाले.
- डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ, एनआयओ

डोळ्याला जबरी मार लागल्याने काचबिंदू होण्याची शक्यता असते. मार लागल्याने या रुग्णाला हा काचबिंदू झाला. त्याच वेळी मोतीबिंदूचेही निदान झाले. या गुंतागुंतीच्या स्थितीत मोतीबिंदू आणि काचबिंदू या दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी करण्यात आल्या. त्यानंतर त्या मुलाची दृष्टी आता सुधारत आहे.
- डॉ. पंकज बेंडाळे, काचबिंदू तज्ज्ञ, एनआयओ