वीजयंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीजयंत्रणेजवळ कचरा
न जाळण्याचे आवाहन
वीजयंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचे आवाहन

वीजयंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचे आवाहन

sakal_logo
By

पुणे, ता. १० : शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीज यंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे अथवा कचऱ्याने पेट घेतल्यामुळे यंत्रणेला धोका निर्माण होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. नागरिकांनी वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये किंवा जाळू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील जागेत घरातील सुका व ओला कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणांमुळे कचरा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडत आहेत. सोबतच वीजयंत्रणेला आग लागण्याची शक्यता आहे. वानवडी स्मशानभूमीजवळ महावितरणचे रोहित्र व फिडर पिलरजवळ टाकलेला कचरा पेटल्याने त्या भागात तीन दिवसांपूर्वी वीजपुरवठा खंडित झाला होता. ही आग विझवून वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली व वीजपुरवठा सुरळीत झाला. कचरा पेटल्यामुळे वीजयंत्रणेला आगीचा धोका असल्याचे लक्षात येताच महावितरणच्या १९१२/१८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.