पुण्यातही ईडीची कारवई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातही ईडीची कारवई
पुण्यातही ईडीची कारवई

पुण्यातही ईडीची कारवई

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील मालमत्तांसह त्यांच्या निकटवर्तीयांवर सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी कारवाई केली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात सकाळी ७.३० ते ११.३० यादरम्यान चार ठिकाणी छापे टाकले. शिवाजीनगर येथील ई स्क्वेअरसमोर, पेट्रोल पंपाच्या मागे एका इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयात छापे टाकून कागदपत्रे जप्त केली. हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका म्यूज सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक राहतात. ईडीच्या पथकाने त्यांचीही चौकशी केली. तसेच, मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार हे साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्क परिसरात राहतात. त्यांच्या घरी छापा टाकून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे एका साखर कारखान्यातील व्यवहारासंदर्भात चौकशी करण्यात आल्याचे समजते. मात्र, याबाबत अधिक तपशील मिळू शकला नाही.

कोणतीही तपास यंत्रणा चौकशी करीत असल्यास त्यांना संपूर्ण सहकार्य केले जाईल. सरकारने विरोधकांवर कारवाई करण्यासाठी सत्तेच्या गैरवापराची परिसीमा गाठली आहे. सरकारने कटकारस्थान करण्यापेक्षा राज्याचा विकास आणि महागाई कमी करण्याबाबत लक्ष दिल्यास जनतेचे भले होईल.
- सुप्रिया सुळे, खासदार
------